विविध कार्यक्रमांसह प्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची होणार सांगता
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुंबा येथील सद्गुरू पादुका, कल्पवृक्ष शिवमंदिर “सद्गुरू धाम” गट न. ३८६ पुरुषोत्तम पाटील नगर, स्वामी समर्थ शाळेच्या पुढे स्वामी समर्थ केंद्राजवळ सालाबादप्रमाणे यंदाही शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज यांचा १५ वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पाद्य पूजन, अभिषेक, दासबोध वाचन, सत्संग, कुमारिका पूजन, पुष्पवृष्टी, प्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता होईल.
कार्यक्रमाचा सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज प्रेमी शिष्य मंडळी, भाविक भक्तांनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज सेवा प्रतिष्ठानचे सचिव जगदीश देवरे यांनी केले आहे.