समाजातील ३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
साईमत/बोदवड/प्रतिनिधी:
अग्रवाल समाजाचे अग्रदूत, श्रीराम प्रभु वंशज, युगपुरुष श्री महाराजा अग्रसेन यांच्या ५१४८ व्या जयंतीनिमित्त अग्रवाल मंडळ, अग्रवाल नवयुवक मंडळ, अग्रवाल महिला मंडळ, अग्रवाल बहु मंडळ, अग्रवाल कन्या मंडळ बोदवड़ यांच्यातर्फे अग्रवाल समाजासाठी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लहान मुलांपासुन ते मोठ्या व्यक्तिपर्यंत कार्यक्रम, १ मिनिट गेम, लकी गेम, लहान मुलांसाठी गेम्स, संगीत-संध्या आयोजित केले होते.
यावर्षी महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त अग्रवाल नवयुवक मंडळाकडून ‘एक घर…एक रक्तदाता’ अभियान राबविण्यात आले. त्यामुळे अग्रवाल नवयुवक मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. अग्रवाल नवयुवक मंडळाच्या सामाजिक अभियानात सर्व समाजातील ३१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला आणि रक्तदान करून अग्रवाल नवयुवक मंडळाला प्रोत्साहित केले. अग्रवाल नवयुवक मंडळ, अग्रवाल मंडळ, गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रसेन भवन, बोदवड येथे भव्य महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. त्या ठिकाणी १२ तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासण्या केल्या. यावेळी अग्रवाल नवयुवक मंडळाचे अध्यक्ष रोहित अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले.
यांचे लाभले सहकार्य
शिबिरासाठी अग्रवाल मंडळ, अग्रवाल नवयुवक मंडळ, अग्रवाल महिला मंडळ, अग्रवाल कन्या मंडळ, अग्रवाल बहु मंडळचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनचे वरिष्ठ उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेचे संरक्षक मिट्ठूलाल अग्रवाल, अग्रवाल मंडळाचे अध्यक्ष संजय अग्रवाल, महिला मंडळ अध्यक्षा शारदादेवी अग्रवाल, बहु मंडळच्या अध्यक्षा पंखुड़ी अग्रवाल, कन्या मंडळच्या अध्यक्षा राधा अग्रवाल यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी अग्रसेन भवनचे व्यवस्थापक संजय अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.