उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत ५५ दिवस उलटूनही ठोस निर्णयाला बगल
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
५५ दिवस उलटूनही उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जमातीच्या प्रमाणपत्राबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे आदिवासी कोळी महादेव जमातीच्यावतीने नळगंगा धरणात शनिवारी जमातीच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. जलसमाधी आंदोलनासाठी सकाळी लवकरच गणेश इंगळे धरणावर पोहोचले. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. यावेळी आदिवासी कोळी महादेव जमातीचा प्रचंड जनसमुदाय नळगंगा धरणाच्या पात्राजवळ हजर होता. पोलिसांनी गणेश इंगळे यांना ताब्यात घेतले तरी मात्र गंगाधर तायडे यांच्या नेतृत्वात एक गट पोलिसांना हुलकावणी देऊन धरणाच्या मुख्य फाटकापर्यंत पोहोचला. त्यांनी धरणात उड्या घेतल्या. नदीपात्रात अगोदरच SDRFचे कर्मचारी जीवनरक्षक बोटसह उपस्थित होते. त्यांनी लगेच जलसमाधी घेणाऱ्या जमात बांधवांकडे नेऊन त्यांचे प्राण वाचवले. यावेळी मोताळा तहसीलचे तहसीलदार हेमंत पाटील त्याठिकाणी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी पुणे येथे प्रशिक्षणाला गेल्याचे त्यांनी सांगितले. मी १४ किंवा १५ तारखेला आपली बैठक उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत लावतो, असे लेखी आश्वासन देऊन मध्यस्थी केली.
आंदोलनात यांचा होता सहभाग
यावेळी संतप्त समाज बांधवांनी प्रचंड घोषणाबाजी केली. आंदोलनात गजानन धाडे, दीपक जाधव, संभाजी गवळी, वासुदेव सोनवणे, विजय बाम्हंदे, किसन बावस्कर, संजय जाधव, गोपाल धाडे, शुभम घुले, सुखदेव तायडे ,भारत झाल्टे, उमेश जाधव, संदीप सपकाळ, किशोर गवळी, अमरदीप तायडे, मनोहर भोलनकर, मंगेश इंगळे, ज्ञानेश्वर सोनवणे, संदीप जाधव, समाधान मघाडे, ज्ञानदेव भोलनकर, लखन सपकाळ यांनी सहभाग घेतला होता. जमातीच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गंगाधर तायडे यांनी दिला आहे. यावेळी ज्ञानेश्वर खवले, डी.एस.सपकाळ, सुरज झाल्टे, अरविंद भोलवनकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.