रिगावला शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली

0
15

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

राज्यासह जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने समोर येत आहे. अशातच कर्जफेडीच्या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे ही घटना घडली आहे. सुरेश ओंकार विटे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

मुक्ताईनगरातील रिगाव येथील सुरेश ओंकार विटे यांची शेती आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीसाठी पीक कर्ज काढले असताना सततची नापिकीमुले कर्ज फेडू शकत नाही. डोक्यावर असलेल्या कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सुरेश विटे हे नेहमीप्रमाणे दोन ऑक्टोबरला रिगाव शिवारातील शेतात गेले होते. यावेळी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले.

वडिलांना बघून फोडला हंबरडा

अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गौरव त्यांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला. यावेळी गौरवला वडील शेतातील झोपडीजवळ बेशुद्धावस्थेत दिसले. त्याने वडिलांना बघून हंबरडा फोडला आणि धावत जाऊन घरी सांगितले. यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेश विटे यांनी तत्काळ शेताकडे धाव घेऊन भावाला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून सुरेश विटे यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here