ईशान, जोहान, शरयू, झाईन, आद्या, राजवर्धन अन्य गटांचे विजेते
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेत मुंबई उपनगरच्या दिव्यांशी भौमिकने मुलींच्या १५ व १७ या दोन्ही गटांचे विजेतेपद प्राप्त केले तर ईशान खांडकेकर (पुणे), जोहान चेलीपरमबील (ठाणे), शरयू टेकाळे (परभणी), झाईन शेख (मुंबई उपनगर), आद्या बाहेती (परभणी) आणि राजवर्धन तिवारी (सोलापूर) ह्यांनी विविध गटांचे विजेतेपद मिळविले.
राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने एकलव्य क्रीडा संकुल येथे ह्या स्पर्धा पार पडल्या. महिला गटाची उपविजेती ठाण्याची काव्या भट १७ वर्षाखालील मुलींच्या गटातही उपविजेती राहिली तर मुंबई उपनगरची वेदिका जैस्वाल ही मुलींच्या ११ आणि १३ या दोन्ही वयोगटात उपविजयी राहिली. शेवटच्या दिवशी ११,१३,१५ व १७ वर्षं वयोगटातील अंतिम सामने खेळले गेले.
विविध गटांच्या अंतिम सामन्यांचे निकाल असे
११ वर्षं वयोगटातील मुलांमध्ये राजवर्धन तिवारी विजयी वि. नभ पंचोलीय (पुणे) ११-६, ११-७, ११-३. मुलींमध्ये – आद्या बाहेती विजयी वि. वेदिका जैस्वाल (मुंबई उपनगर) ११-५, ११-५, १२-७. १३ वर्षं वयोगट मुलांमध्ये- झाईन शेख विजयी वि. परम भिवंडकर (मुंबई उपनगर) ११-९, ४-११, ९-११, १४-१२, ११-९. मुली- शरयू टेकाले विजयी वि.वेदिका जैस्वाल (मुंबई उपनगर) ११-५, ११-३, ९-११, ११-३. १५ वर्षं वयोगट मुलांमध्ये जोहान चेलीपरमबील विजयी वि. मयुरेश सावंत (ठाणे) ११-४, ११-१३, ११-७, १२-१०. मुली- दिव्यांशी भौमिक विजयी वि. नायशा रेवस्कर ११-३, ११-८, ५-११, ११-३. १७ वर्षं वयोगटातील मुलांमध्ये ईशान खांडेकर विजयी वि. कौस्तुभ गिरगावकर (पुणे) १०-१२, १२-१०, ११-३, ११-१.मुलींमध्ये दिव्यांशी भौमिक विजयी वि. काव्या भट (ठाणे) ११-९, ११-९, १२-१०. अंतिम सामन्यांनंतर लगेचच बक्षीस वितरण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे भालचंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव यतीन टिपणीस, माजी नगरसेवक नितीन बरडे, जिल्हा असोसिएशनचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. चारुदत्त गोखले, उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, सचिव विवेक आळवणी, सहसचिव सुनील महाजन, कोषाध्यक्ष संजय शहा, ॲड. विक्रम केसकर, मुख्य पंच रोहित शिंदे आदी उपस्थित होते.