अमळनेर शहरात पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी : मंत्री अनिल पाटील

0
28

शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामांचा समावेश

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :

येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यातून महत्त्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलीत वस्ती सुधार योजनेतून ही कामे मंजूर झाली आहेत. त्यात प्रामुख्याने अत्यंत दुरवस्था झालेल्या रेल्वे उड्डाणपूल ते बंगाली फाईलकडून विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश असल्याने या परिसरासह बोरी काठच्या गावांची सोय होणार आहे. तसेच बस स्टँड शेजारील अत्यंत दयनीय अवस्था झालेला गांधी नगरचा रस्ता आणि प्रताप महाविद्यालयाजवळील रेल्वे उड्डाणपूल ते प्रोफेसर कॉलनीपर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. याशिवाय अनेक भागातील खुले भूखंड यातून विकसित केले जाणार आहेत.

प्रामुख्याने ही होणार कामे

अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ११ मध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे व चेकर्स टाईल्स बसविणे रक्कम ३०६९५८६ अमळनेर नगरपरिषद हद्दीतील गांधीनगरकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व संरक्षण भिंत बांधकाम करणे रक्कम ७०५५०९२ रुपये, अमळनेर नगरपरिषद हद्दीतील आयडीबीआय बॅक ते पेट्रोल पंपपर्यत रस्ता कॉक्रीटीकरण करणे रक्कम ३९४९९२७ एकुण रक्कम १४०७४६०५

तसेच अमळनेर नगरपरिषद हद्दीतील सानेगुरूजी उड्डानपुल ते प्रोफेसर काॅलनीपर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रक्कम ७४४१८८५ ,अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.3 मध्ये रस्ता काॅक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे ५६०३६९१ तसेच अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग ८ मध्ये रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे ७०५७१४९सानेगुरुजी उड्डाणपूल ते बंगाली फाईलपर्यंत रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे ७९८७७६७, मंगळनगर भागात खुला भूखंड उद्यान विकसित करणे ४६४७६४५, गट क्रमांक १३७३ मध्ये खुला भूखंड उद्यान विकसित करणे २८२१९९१ आदी कामांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह मंत्र्यांचे मानले आभार

विकास कामांना मंजुरी दिल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here