मनपात आयसीटी बेस टेक्नॉलॉजीचा वापरावर प्रशिक्षण कार्यशाळा
साईमत/जळगाव/न.प्र.:
‘स्वच्छता ही सेवा’ २०२४ उपक्रमांतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेमार्फत मनपाच्या सभागृहात आयसीटी बेस टेक्नॉलॉजीचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त अविनाश गांगोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक, मदतनीस, मोकादम, स्वच्छता निरीक्षक यांना आयसीटी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आयटीआय कंपनी लिमीटेड यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले.कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्तउदय पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, जितेंद्र किरंगे, नागेश्वर लोखंडे, शहर समन्वयक राजेश रमण पाटील, प्रशिक्षक आशिष कुलकर्णी, पर्यवेक्षक दिनेश चौधरी, मनपाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्तअविनाश गांगोडे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वॉटर ग्रेस कर्मचारी यांना कचरा विलगीकरण आणि कचरा संकलनाबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तथा सुत्रसंचलन कक्ष प्रमुख आनंद चांदेकर यांनी केले.
