चांदसरकर विद्यामंदिर शाळेत राष्ट्रपिता म.गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
साईमत/जळगाव/न.प्र.:
साने गुरुजी कॉलनीतील खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.गि.न.चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चेतना महाजन, सुनीता सिमाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाविषयी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे, जयश्री पाटील, स्वप्निल भोकरे, शारदा चौधरी, दीपिका सोनवणे, वैशाली सोनवणे, उज्ज्वला भामरे, सुनिता पाटील, मनीषा वाघ, प्रिया कोपरकर, भूषण अमृतकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पूनम पाटील तर आभार महेश तायडे यांनी मानले.