Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू या : डाॅ. सुदर्शन अय्यंगार
    जळगाव

    अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू या : डाॅ. सुदर्शन अय्यंगार

    saimatBy saimatOctober 2, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अहिंसा सद्भावना यात्रेत जळगावकरांचा लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

    साईमत/जळगाव/न.प्र.:

    चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा आणि त्यात सुधारणा होण्याकरिता प्रायश्चित अवश्य करा, हे महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्वाचे सुत्र प्रत्येकाने अंगिकारावे. तन व मन स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शुद्ध आचारण ठेवून अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू, या असा मोलाचा संदेश गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.

    महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले होते. लाल बहादूर शास्त्री टॉवर येथे मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी डाॅ. सुदर्शन अय्यंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. ही यात्रा नेहरू चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक–डॉ. हेडगेवार चौक – स्वातंत्र्य चौक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.

    याप्रसंगी व्यासपीठावर खासदार स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, दिल्ली विद्यापीठाचे पुलिन नायक, डाॅ. भरत अमळकर, माजी महापौर जयश्रीताई महाजन, ज्योती जैन, डाॅ. गीता धरमपाल आदी मान्यवर उपस्थित होते.

    अहिंसा सदभावना यात्रेत अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, डाॅ. शेखर रायसोनी, राजेंद्र मयूर, अनिश शहा, शिरीष बर्वे, अमर जैन, डाॅ. राजेश पाटील, उपायुक्त अविनाश गांगुर्डे, मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, एजाज मलिक, विनोद देशमूख, दीपक सूर्यवंशी, विष्णु भंगाळे, शिवराम पाटील, प्रवीण पगारीया, शोभना जैन, निशा जैन, डाॅ. भावना जैन यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक शिक्षक, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी, जैन उद्योग समूहातील सहकारी उपस्थित होते.

    अहिंसा सदभावना यात्रेचा समारोप महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन झाले. महात्मा गांधी उद्यानातील सभेची सुरुवात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आरंभी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जन तो.. हे भजन म्हटले. यानंतर सर्वधर्म प्रार्थना झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अहिंसेची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली.

    सूत्रसंचालन गिरीष कुलकर्णी यांनी केले.

    आजही महात्मा गांधीजींचे विचार, मुल्ये यावर आचरण केले जाते. याबाबत गोष्टी स्वरूपात डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. चुक ही व्यक्ती, परिवार, समाजात आर्थिक व्यवहारात, राजनैतिक व्यवहारात यासह कुठल्याही क्षेत्रात होऊ शकते. ती लहान असो किंवा मोठी असो त्याचे परिमार्जन हे स्विकृती, पश्चाताप आणि त्याचे प्रायश्चीत या तिनही गोष्टी केल्यानेच मनुष्याच्या चरित्र्यात सुधारणा होईल. त्यातून व्यक्तीमत्व घडेल आणि राजकीय नेतृत्त्व चारित्र्य संपन्न होईल, असा संदेशही डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.

    बैलगाडीवरील चरखा सूतकताई ठरले आकर्षण

    यात्रेत आनंदीबाई जोशी, जिजामाता, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडीत नेहरू, स्वामी विवेकानंद, सानेगुरुजी, भगतसिंग, डाॅ. ए. पी. जे अब्दुल कलाम, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी झाले होते. विदेशी विद्यार्थीही सहभागी होते. बैलगाडीवर चरखा सूतकताई हे आकर्षण ठरले होते.

    यात्रेत या शाळांचा होता सहभाग

    यात्रेत पुष्पावती गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालय, नंदिनीबाई माध्यमिक विद्यालय, ओरियन इंग्लिश मिडीअम स्कूल, के के उर्दू हायस्कूल, ए टी झांबरे विद्यालय, सेंट टेरेसा इंग्लिश मिडीअम, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेकंडरी, अनुभूती निवासी स्कूल, यादव देवचंद पाटील, हरिजन छात्रालय या शाळांसह जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक व खेळाडूंसह सहभाग घेतला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : गणेश जयंतीनिमित्त जळगावात भक्तिरसाचा महोत्सव; मंदिरांत भाविकांची लोटलेली गर्दी

    January 22, 2026

    Jalgaon : जळगाव महापौरपदासाठी ‘लाडक्या बहिणींची’ नावे चर्चेत

    January 22, 2026

    Jalgaon : मालेगावजवळ माजी महापौर जयश्री महाजन यांच्या कारचा भीषण अपघात

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.