वर्षातील आठ थीमद्वारे कौशल्यपूर्ण शिक्षणाचे धडे
साईमत/पारोळा/प्रतिनिधी :
येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये भगतसिंग यांची नुकतीच जयंती साजरा करण्यात येऊन विद्यार्थ्यांना त्यांची माहिती देण्यात आली. तसेच त्यानिमित्त खेळातून प्रशिक्षण देणाऱ्या संकल्पनेला साजेशी अशी प्रोफेशनल अँड इंडस्ट्रियल थीमचे आयोजन केले होते. प्ले ग्रुप,नर्सरी, ज्युनिअर के.जी.व सिनियर के.जी.तील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनियर, नर्स, शिक्षक, हॉटेल मॅनेजमेंट, पोलीस, सैनिक, शेतकरी, फिल्म कलाकार, शृंगार करून पालकांनी स्वतः सहभाग म्हणून विविध प्रकारे व्यावहारिक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी स्वतः प्रदर्शित केले.
पालकांनी उत्स्फूर्त पद्धतीने विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी मदत केली. विद्यार्थ्यांनी स्कूलमध्ये जशीच्या तशी थीम त्याद्वारे सर्व व्यावसायिक शिक्षण ग्रहण केले. अशा प्रकारचे व्यवहारिक आणि व्यावसायिक ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले.टायगर स्कूलमध्ये वर्षाच्या आठ थीम घेतल्या जातात. त्या थीममध्ये सामाजिक व व्यावसायिक कौशल्याद्वारा शिक्षण दिले जाते. याद्वारे मुले हसत खेळत शिक्षण घेतात. जेव्हा विद्यार्थी या तीनद्वारे दिलेला टास्क घरी पूर्ण करतात, तेव्हा त्यांना स्कूलमध्ये ट्रॅडिशनल शिकवण्याची गरज पडत नाही.
यावेळी कार्यक्रमात चेअरमन रवींद्र पाटील, डायरेक्ट रूपाली पाटील, प्राचार्य श्रीनिवास राव, अजीम शेख, उपप्राचार्य कविता पाटील, ॲडमिनिस्ट्रेटर विश्वास पाटील, विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर, वृषाली पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.