अर्जुन पुरस्कारार्थी मधुरिका पाटकर, राष्ट्रीय खेळाडू स्वरदा साने यांचा गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित आमदार चषक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला.जळगावच्या एकलव्य क्रीडा संकुल येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी कु. व्ही. केजो ह्यांनी टेबल टेनिस खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, माजी महापौर सीमा भोळे, प्रा. चारुदत्त गोखले, शिव छत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवलकर, माजी नगरसेवक नितीन बर्डे, असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, सचिव विवेक आळवणी, सहसचिव सुनील महाजन, राजु खेडकर, कोषाध्यक्ष संजय शहा, रवींद्र धर्माधिकारी, सॉफ्टबॉल प्रशिक्षक किशोर चौधरी,गिरीश कुलकर्णी, अरुण गावंडे, मुख्य पंच रोहित शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमात अर्जुन पुरस्कारार्थी भारतीय खेळाडू मधुरिका पाटकर (ठाणे) व सलग दुसऱ्यावर्षी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेली जळगावची राष्ट्रीय खेळाडू स्वरदा साने ह्यांचा गौरव करण्यात आला.
यानंतर पुरुष, महिला गटाच्या सामान्यांना सुरुवात झाली. आकर्षणाचा केन्द्र असलेली महिला गटातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू ठाण्याच्या मधुरिका पाटकरने अनुभवाच्या जोरावर ठाण्याच्याच अन्वी गुप्तेचा ८-११, ११-७, १३-१२, ११-७ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
उर्वरित सामन्यांचे निकाल असे-
आर्या सोनगडकर (ठाणे) विजयी वि. मिताली पुरकर (नाशिक) ११-७,११-२, ११-७, अनन्या चांदे (मुंबई उपनगर) विजयी वि.श्रुती अमृते (ठाणे) १२-१०, ८-११, ८-११, ११-७, ११-८, श्रेया देशपांडे (ठाणे) विजयी वि. श्वेता नायक (मुंबई उपनगर) ११-७, ७-११, १०-१२, १२-१०, ११-७, संपदा भिवंडकर विजयी वि. अनिशा पात्रा (रायगड) ५-११, ८-११, ११-९, ११-९, १३-११, समृद्धी कुलकर्णी (पुणे) विजयी वि. रिशा मिरचंदानी (मुंबई उपनगर) १२-१०, ११-६, ११-९. या खेळाडूंनी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
पुरुषांसह महिला गटातील विजेत्यांना मंगळवारी पारितोषिक वितरण
महिला गटामध्ये ठाण्याच्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करून वर्चस्व निर्माण केले. पुरुष, महिला व युथ गटाचे बक्षीस वितरण राज्य मानांकन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता पुरुष व महिला गटातील विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रास्ताविक ॲड. विक्रम केसकर, सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी केले.