जळगाव जनता बँके शून्य टक्के एनपीए पुरस्काराने सन्मानित
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जनता सहकारी बँक तर्फे २०२३-२४ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी करून बँकेचे एन पी ए शून्य टक्के ठेवण्यात यश मिळाल्याबद्दल पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे यांच्या वतीने जळगाव जनता बँकेला शून्य टक्के एन.पी.ए. या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील कै विजय तेंडुलकर सभागृहात जीवन गौरव पुरस्कार प्रदान आणि पुरस्कार वितरण समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष ॲड. साहेबराव टकले आदी उपस्थित होते.
यावेळी जळगाव जनता बँकेच्या वतीने बँकेचे संचालक जयंतीलाल सुराणा, बँकेचे अधिकारी पंकज पाटील, वैदेही देशपांडे, दिनेश मडके, जितेंद्र रायसिंग यांनी पुरस्कार स्वीकारला.
बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक यांचे सहकार्य व बँकेवरील विश्वास यामुळेच सदर पुरस्कार प्राप्त झाला आहे असे बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने , बॅकेचे उपाध्यक्ष डॉ. अतुल सरोदे, बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती यांनी संचालक मंडळाच्या वतीने कळविले आहे.