युवासेनेतर्फे उद्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन
9 मुलांचे व 5 मुलींचे संघ होणार सहभागी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने युवासेनेतर्फे उद्या मंगळवार दि. 1 ऑक्टोबर रोजी जी. एच. रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड, जळगाव येथे सलग चौथ्या वर्षी जळगाव जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या फलकाचे अनावरण नुकतेच शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना तथा युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेजकक्षचे जळगाव लोकसभा युवाधिकारी प्रितम शिंदे, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, चंद्रकांत शर्मा, सुरज पाटील, उपमहानगर युवाधिकारी प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, पियुष हसवाल, अजय खैरनार, यश मोरे आदि उपस्थित होते.
स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून कुमार वयोगटातील 9 मुलांचे तसेच 5 मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे तांत्रिक आयोजन जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र शिंदे व सहकारी यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.