सोयगाव तालुक्यातील विविध गावात शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचे मोफत वाटप

0
30

माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्याहस्ते मोफत वाटप

साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या सोयगाव तालुक्यातील विविध गावात युवानेते तथा माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्याहस्ते शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचे मोफत वाटप करण्यात आले.
आनंद शिधासाठी लागणारे १०० रुपये शुल्क पालकमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्यावतीने भरण्यात आले. त्यामुळे सोयगावच्या ३८ स्वस्त धान्य दुकान अंतर्गत १३ हजार ६०० लाभार्थ्यांना गावोगावी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद शिधा वाटप करण्यात येत आहे. त्यासोबतच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना गृहपयोगी साहित्य भांडेचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्वस्त धान्य दुकानदारांना कुठलेही शुल्क देवू नये

सणासुदीच्या तोंडावर सोयगावच्या विविध गाव व तांडा, वस्तीत सर्वसामान्यांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, आणि खाद्यतेल मोफत मिळत असल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधासाठी लागणारे १०० रुपये शुल्क पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार मित्र मंडळाकडून भरण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आनंदाचा शिधासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना कुठलेही शुल्क देवू नये, असे आवाहन माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ.सत्तार यांनी केले आहे.

यांची लाभली उपस्थिती

याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर आबा काळे, दारा शेठ, गोपीचंद जाधव, धरमसिंग चव्हाण, संतोष बोडखे, अक्षय काळे, शिवाप्पा चोपडे, आरिफ शेख, सुरेश चव्हाण, भागवत जाधव, सांडू तडवी, राहुल हॅलोडे, संतोष आळेकर, लहू चव्हाण, वासुदेव कांदेलकर, रहेमान तडवी, कय्युम तडवी, सिराज तडवी, राधेश्याम जाधव, कृपालसिंग बातळे, दिलीप जाधव, दीपक चडोल, श्रावण जाधव, रतन सुरवाडे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here