चावा घेतल्यानंतर २४ तासात अँटी रेबीज लस घ्यावी : डॉ.राजेश सोनवणे

0
23

जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

संचालक आरोग्य सेवा हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग महाराष्ट्र राज्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे यांच्या आदेशानुसार जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रेबीज विषयक सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना प्राणी किंवा कुत्रा लावल्यानंतर घ्यावयाची काळजी, पाळीव प्राण्यांना रेबीज लस देऊन प्राण्यांचे रेबीजपासून स्वरक्षण करण्याबाबत माहिती देण्यात आली. पूर्वी बेंबीच्या बाजूने १४ इंजेक्शन यासाठी देण्यात येत होते. परंतु आता संशोधन होऊन साध्या इंजेक्शनप्रमाणे त्याचे ३ ते ५ डोस देण्यात येतात.

डॉक्टरांनी दिलेल्यानुसार डोस पूर्ण करावे

कुत्रा किंवा प्राणी चावल्यानंतर २४ तासाच्या आत सरकारी दवाखान्यात रेबीज लस घ्यावी.चावा अधिक मोठा असल्यास जिल्हा रुग्णालयात रेबीज सीरम घेणे आवश्यक असते. प्राण्याने किंवा कुत्राने चावा घेतल्यानंतर तात्काळ वाहत्या पाण्याने ३ ते ५ मिनिटांपर्यंत जखम स्वच्छ धुवावी, ड्रेसिंग किंवा टाके घेऊ नये. जखमेवर जंतुनाशक मलम लावावे. डॉक्टरांनी दिलेल्यानुसार डोस पूर्ण करावे, अशी माहिती तालुका वैद्यकीय डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.

तालुक्यातील रेबीज लस उपलब्ध साठा असा:

उपजिल्हा रुग्णालय, जामनेर-२००
ग्रामीण रुग्णालय, पहुर-१२०
प्राथमिक आरोग्य केंद्र, बेटावद-३०
प्राथमिक आरोग्य केंद्र, गारखेडा-२०
प्राथमिक आरोग्य केंद्र, नेरी-३२
प्राथमिक आरोग्य केंद्र, फत्तेपूर-३९
प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंदूर्णी-९०
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाकडी-६९
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाकोद-४०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here