चार वर्ष पूर्ण केल्यानंतर कृषी पदवी मिळणार
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
येथील कृषी महाविद्यालयात येथील कृषी पदवी अभ्यासक्रमात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील होते. समारंभात महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव प्रशांत नागे आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना आपला परिचय करून देतांना त्याच्याकडे असलेच्या जबाबदाऱ्या सांगितल्या.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंतर्भूत केलेल्या सत्र प्रथम ते आठव्या सत्रात समाविष्ट केलेल्या विषयांची सखोल माहिती महाविद्यालयाचे विद्या शाखा प्रभारी डॉ. आर. डी. चौधरी यांनी दिली. तसेच त्यांनी प्रथम वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कृषि प्रमाणपत्र व द्वितीय वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कृषी पदविका प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच चार वर्ष पूर्ण केल्यानंतर कृषी पदवी मिळेल, असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगत डॉ. संदीप पाटील यांनी व्यक्त करुन मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. जी. पी. देशमुख, सूत्रसंचालन डॉ. तुषार भोसले तर आभार डॉ. कुशल ढाके यांनी मानले.