साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात विविध कार्यक्रम राबविले जात आहे. याच मोहिमेत कमी माईक्रॉनच्या प्लास्टीकचा वापर बंद करावा, यासाठी आकस्मिक पाहणी करण्यात आली. यात आरोग्यास अपायकारक प्लास्टीक वापर होत असल्याचे दिसून आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथकाने सुप्रीम कॉलनी परिसरातील दुकानातून १० किलो कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक जप्त करत दुकान चालकास ५ हजार रुपये दंड करण्यात आला.
सदर कारवाई गुरुवारी दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुप्रीम कॉलनी येथील अपना स्वीट या दुकानात करण्यात आली. दुकानातून सुमारे १० किलो कमी मायक्रॉनच्या प्लॉस्टीक पिशव्या आढळून आल्या त्या जप्त करून दुकान चालकास ५ हजार रुपये दंड करण्यात आला.
सदर कारवाई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्र. सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, आरोग्य निरीक्षक मनोज राठोड व मुकादम यांनी केली.