साकेगावात अनैतिक संबंधातून महिलेची हत्या ?

0
119

संशयित आरोपीला अटक, हल्ल्यात एक किरकोळ जखमी

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :

येथून जवळच असलेल्या साकेगाव येथे एका तरुणाने चाकूने भोसकून महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. यावेळी एक जण किरकोळ जख्मी झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे .

सविस्तर असे की, सोनाली महेंद्र कोळी हिला २५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सागर रमेश कोळी हा जोरजोरात शिविगाळ व आरोळ्या मारत सोनाली कोळीच्या पाठीवर व पोटाच्या बाजूला चाकुने वार करीत होता. यावेळी विनोद सुभाष कुंभार (रा . साकेगाव) हा वाचविण्यासाठी गेला होता. ‘तू आमच्यामध्ये पडू नको’ असे म्हणत सागरने विनोद कुंभारच्या उजव्या हाताच्या बोटाला चाकुने दुखापत केली. तसेच मारुन टाकण्याची धमकी दिली, अशी फिर्याद विनोद सुभाष कुंभार याने दिली आहे. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक संबंधातून हत्येची घटना घडल्याची चर्चा

घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. भुसावळ उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णांत पिंगळे, तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव पुढील तपास करीत आहेत. आरोपी सागर रमेश कोळी (रा.भवानी नगर, साकेगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हत्येची घटना अनैतिक संबंधातून घडल्याची चर्चा गावात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here