बंजारा समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील : माजी खासदार उन्मेशदादा पाटील*

0
18

सेवानगर येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जल्लोषात प्रवेश

साईमत/चाळीसगाव /प्रतिनिधी :

तालुक्यातील बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आणि खासदार असताना सतत प्रयत्नशिल होतो. आजही समाजातील प्रत्येक व्यक्तींशी संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर आहे. समाजाने विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी माझी धडपड सुरू आहे.समाजाने मला दिलेले प्रेम आशिर्वाद याचे भान सदैव राहील, अशी भावना शिवसेना नेते माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सेवानगर, ता. चाळीसगाव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला संत सेवालाल महाराज, श्री संत बाळूमामा व हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते ॲड. राजेंद्र सोनवणे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, बेलगंगा संचालक बाळासाहेब पाटील, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी, ओबीसी सेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, भटक्या सेना जिल्हा प्रमुख मारोती काळे, तालुका प्रमुख अनिल चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख गणेश महाजन, व्यापारी सेनेचे अमित सुराणा, पिनूबाबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी उन्मेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याची भावना युवा कार्यकर्ते गणेश राठोड यांनी व्यक्त केली.याप्रसंगी पांझण डावा कालवा समितीचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र सोनवणे, रामेश्वर हजारी यांनी मनोगत व्यक्त केले.

यांची लाभली उपस्थिती

यावेळी गणेश राठोड,भाईदास चव्हाण, मकरंद चव्हाण, किसन चव्हाण, भाऊसाहेब राठोड, राकेश राठोड, गोपाल राठोड, सुखदेव राठोड, विजय भाऊ राठोड, गोरखनाथ राठोड, संदीप राठोड, लक्ष्मण राठोड, खुशाल धनगर, रंजीत राठोड, अमोल राठोड, यशवंत राठोड, सोनू राठोड, भगवान राठोड,रामेश्वर राठोड, विठ्ठल शिंदे, रावसाहेब तांबे, सुपडू अहिरे, चिमा कोळी, खुशाल तांबे, समाधान चव्हाण, पंडित राठोड, ईश्वर चव्हाण, बाबू राठोड, सुधाकर राठोड, निलेश चव्हाण, हिरामण चव्हाण, हनुमान पवार,प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल चव्हाण तर गणेश राठोड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here