विद्यालयाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार
साईमत/भडगाव/प्रतिनिधी :
येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित आमडदे येथील सौ.साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, शाळेत संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २३व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव हरी पाटील होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ. पूनम पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी मानद सचिव तथा कै. दीनानाथ दूध उत्पादक सोसायटी आमडदे येथील चेअरमन जगदीश पाटील, पाचोरा येथील व्याख्याते रवी पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र पाटील, धर्मराज भोसले, किशोर पाटील, नारायण पाटील, रमेश पाटील, युवराज भोसले, लीलाधर पाटील, पत्रकार विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.वळखंडे, प्राथमिक मुख्याध्यापक विलास पाटील, पर्यवेक्षक अमृत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब यांच्या पुण्यस्मरण सप्ताहनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच कै.ताई आजी कै. युवराज दादा पाटील कै.अशोक अण्णा पाटील कै. सौ साधनाताई पाटील विद्येची देवता शारदा माता यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन श्रीफळ वाहून व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पाचोरा येथील व्याख्याते रवी पाटील यांनी शापित राजहंस छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान देऊन संभाजी राजांविषयी सविस्तर माहिती दिली. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंनी परिश्रम घेतले. प्रास्ताविकात विद्यालयातील प्राचार्य आर.आर.वळखंडे यांनी कर्मवीर तात्यासाहेब यांच्या पुण्यस्मरण सप्ताहविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षक प्रशांत सोनवणे तर आभार संदीप सोमवंशी यांनी मानले.