आपत्ती व्यवस्थापनासाठी ६.९५ कोटी रुपये मंजूर

0
16

मुक्ताईनगर मतदार संघाचे आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याकडे मुक्ताईनगर मतदार संघातील आपत्ती व्यवस्थापन करिता विविध गावातील प्रस्तावित कामांना मंजुरी मिळावी यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मतदार संघातील ६.९५ कोटी रुपयांच्या आपत्ती सौम्यीकरण कामांना, महाराष्ट्र शासन ,महसूल व वन ,(आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२४ अन्वये प्रशासकीय मान्यता मिळाली असून गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पूर प्रतिबंधक कामांना गती मिळणार आहे, अशी माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील गेल्या अनेक वर्षांपासून २५० च्या वरील घरांना पावसाळ्यात अचानक उद्भवलेल्या आपत्तीतून प्रभाव होऊन पूर स्थितीचा फटका बसत होता. त्यामुळे पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी रस्ता, गटार आणि संरक्षण भिंत होणे गरजेचे होते. गावकऱ्यांची देखील हीच प्रमुख मागणी होती. आ.चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून यासाठी सुमारे २.२५ कोटी रुपयांच्या भरघोस निधी खेचून आणल्याने, उचंदा वासियांची काळजी मिटली असल्याने गावकऱ्यांतर्फे आनंद व्यक्त होतआहे. त्यामळे आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले जात आहे.

या कामांना मिळाली मंजुरी

सावदा येथे रेल्वे स्टेशन गेट उदळी, हतनूर, मानपूर, चांगदेव, हरताळे प्रजिमा १६ किमी २०/२००, २२/२०० संरक्षण भिंत बांधणे.(१.५० कोटी)
रामा – ४७ ते धामणगाव ग्रामा ३७ कि.मी. ०/२००१/८००.२/०० ग्रामा ३७ किमी ०/२००१/८००.२/०० संरक्षण भिंत बांधणे. (१.५० कोटी)

अंतुर्ली ते नरवेल इजिमा २४ स्मशानभूमीजवळ संरक्षण भिंत बांधणे (४० लाख)
सुलवाडी, ता.रावेर येथे संरक्षण भिंत बांधणे (५० लाख)
पुरणाड ते उचंदा २८ रस्ता , गटार तसेच संरक्षण भिंत बांधणे ( २.२५ कोटी)
ऐनपूर, ता.रावेर येथे संरक्षण भिंत बांधणे (४० लाख )
विटवा, ता.रावेर मागासवर्गीय वस्तीजवळ संरक्षण भिंत बांधणे ( ४० लाख)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here