चोपडयात आरक्षणासाठी धनगर समाजाचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

0
13

आंदोलकांनी पोलीस निरीक्षकांना दिले मागण्यांचे निवेदन

साईमत।चोपडा।प्रतिनिधी।

तालुक्यातील सकल धनगर समाजाने त्यांच्या जमातीचा अनुसूचित जमातीमध्ये (एस टी) अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी, २३ सप्टेंबर रोजी ११:३० वाजता येथील तिरंगा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाज जमातीच्यावतीने, अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर येथे समाज बांधव १५ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. शासनाने अद्यापही त्यांची दखल घेतलेली दिसून येत नाही. म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी व तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने महात्मा गांधी उद्यानाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांमार्फत पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम म्हाळके, मोर्या क्रांतीचे आर.सी.भालेराव, चोसाकाचे व्हा.चेअरमन गोपाल धनगर, अरुण कंखरे, संदीप धनगर, कविता शिरसाठ, अनिता धनगर आदींनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. आमच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यांचा होता आंदोलनात सहभाग

आंदोलनात माजी नगरसेवक महेंद्र धनगर, डॉ.अशोक कंखरे, डी.एस.धनगर, दीपक बिऱ्हाडे, भगवान नायदे, मार्केट कमिटीचे संचालक शरद धनगर, शेतकी संघाचे संचालक देविदास धनगर, डॉ.सुभाष शिरसाठ, माजी नगरसेविका सरला शिरसाठ, छाया शिरसाठ, मुकबधीर विद्यालयाच्या अध्यक्षा लीला पाकळे, माजी सरपंच बबिता धनगर, सुनील बागुले, भावलाल पाकळे, सचिन धनगर, सुभाष धनगर, नंदलाल धनगर, नितिन पाकळे, राहुल शिरसाठ, मगन बोरसे, संदिप बिर्हाडे, साहेबराव कंखरे, भुपेंद्र धनगर, योगेश कंखरे, सुरेश शिरसाठ, नवल धनगर, सुरेश चिंचोरे, सचिन सांगोरे यांच्यासह तालुक्यातील समाजाचे सर्व पक्षीय नेते, समाज बांधवांसह महिलांचा सहभाग होता. मोर्चास उपस्थितांचे आभार प्रदीप नायदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here