पाचोऱ्यात ‘एक शाम रामदेवजी के नाम’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
19

वैशालीताई सूर्यवंशी यांनी जिंकली भाविकांची मने

साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या नेत्या आणि पाचोरा -भडगाव मतदारसंघांच्या उमेदवारीच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार स्व.आर. ओ. तात्यापाटील यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघांत सर्वच स्तरावर संपर्क अभियानाला गती दिली आहे. त्या मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक, अध्यात्मिक, शेतकरी हितांचे कृषी मेळावे, सोबतच महिलांची मने आणि मते आपल्याकडे वळविण्यासाठी महिलांच्या संदर्भातील रांगोळी स्पर्धा, सौभाग्याचे लेणं असलेला हळदीकुंकू कार्यक्रम, रंगपंचमी, होळी, नवरात्री उत्सवाच्या दांडियारास, दीपावली हिंदू मुस्लिम व सर्वच सामाजिक सणांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करणे, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबिर, ज्येष्ठ पुरुष महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर, दहीहंडी, गणपती उत्सव तसेच नागरिकांच्या मूलभूत सामाजिक, धार्मिक गरजा ओळखून राजकीय, शैक्षणिक यासारखे सर्व समाजाभिमुख नाविण्यपूर्ण कार्यक्रम पुढच्या दुरदृष्टीने पाचोरा-भडगाव शहरासह ग्रामीण भागातही राबवित आहेत. त्यांच्या उपक्रमांना तरुणाई, महिलांची आणि जेष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभत आहे.

सौ.वैशालीताई सूर्यवंशी यांनी पाचोरा भडगाव रस्त्यालगतच्या कैलादेवी मंदिराच्या शेजारील जागेत हैद्राबाद येथील भारतात भजन गायक सुशील बजाज यांच्या ‘एक श्याम रामदेवजी बाबा के नाम’ विशाल भजनसंध्या कार्यक्रम आयोजन करून भाविकांची मने जिंकली. कार्यक्रमास दोन्ही तालुक्यातील वंजारी समाजबांधव, रामदेवजी बाबांचे अनुयायी, मारवाडी, राजस्थानी, गुजराथी आणि शहरातील सर्व समाजाच्या भाविक भक्तांनी अभूतपूर्व गर्दीची उपस्थिती देवून भजनसंध्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.यावेळी विशेषतः वंजारी समाजाच्या महिला, तरुणींनी वंजारी समाजाच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून मंडपात पारंपरिक नृत्य सादर केल्याचे पहायला मिळाले.

यांची लाभली उपस्थिती

याप्रसंगी उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते श्रीमती कमलताई पाटील, निर्मल उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील, अन्य संचालक, वैशालीताई सूर्यवंशी, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, पदाधिकारी अरुण पाटील, रमेश बाफना, उद्धव मराठे, भरत खंडेलवाल, संतोष पाटील, नाना वाघ यांच्यासह महिला पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here