उभारणीपूर्वीच जलकुंभ आला अडचणीत

0
70

जरंडीला जलजीवन मिशन योजना वांध्यात

साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

जलजीवन योजनेत उभारण्यात येत असलेल्या ७० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभासाठी केवळ सहा ते आठ मी.मी.च्या आसारीवर बांधकामाचा पाया रचण्यात येत असल्याचा प्रकार रविवारी ग्रामस्थांनी जरंडी येथे उघडकीस आणला आहे. दरम्यान, जलकुंभाच्या अर्धवट झालेल्या कामावर पाणीही मारले जात नाही. त्यामुळे हा जलकुंभ उभा होण्याच्या आधीच अडचणीत आला आहे. संबंधित ठेकेदार केवळ ‘बोल बच्चन’ गप्पा मारत आहे.

जरंडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत गावाच्या शुद्ध पाणी पुरवठासाठी जिल्हा परिषदेने जलजीवन मिशन ही मोठी योजना मंजूर केली आहे. मात्र, योजनेचा जलकुंभाच्या कामात ठेकेदाराकडून हात आखडता घेऊन बांधकाम सुरू आहे. सत्तर हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या कामासाठी गावठी रेती वापरून काम नित्कृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे उभारणी आधीच जलकुंभ अडचणीत सापडला आहे.

संबंधित ठेकेदाराकडून मनमानी सुरू असल्याचा ग्रामस्थांनी केला आरोप

योजनेत जलकुंभाच्या कामासाठी वीस लाख ६७ हजार इतकी रक्कम मंजूर आहे. मात्र, विना अंदाजपत्रक हे काम सर्रासपणे सुरू आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराकडून मनमानी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अंदाजपत्रकानुसार काम करण्याऐवजी ठेकेदार, अभियंता हे काम मिळालेल्या डिझाइननुसार सुरू असल्याचे सांगतात. त्यामुळे ठेकेदाराला अंदाजपत्रक दिले नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कामाची चौकशी करावी, अशी मागणी विष्णू वाघ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here