स्वत:चा फोटो असलेला ‘पोट्रेट’ देऊन तहसीलदार भारावल्या
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी
तालुक्याच्या तहसीलदार नीता लबडे यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत नीता लबडे यांचा उत्कृष्ट तहसीलदार म्हणून नुकताच सन्मान केला होता. याबद्दल भुसावळ स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने निता लबडे यांचा तहसील कार्यालयात त्यांना त्यांच्या फोटोचे ‘पोट्रेट’ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार यांनी त्यांचे स्वतःचे ‘पोट्रेट’ पाहून भारावून गेल्या होत्या.
यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील, जळगाव जिल्हा सचिव सुनील अंभोरे, रावेर विभागीय अध्यक्ष संतोष माळी, कैलास उपाध्याय, तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, तालुका उपाध्यक्ष सी. आर. पाटील, तालुका सचिव उल्हास भारसके, संघटक ईश्वर पवार, शहराध्यक्ष आरिफ मिर्झा, कार्याध्यक्ष पंकज पाटील, शहर उपाध्यक्ष राजेश सैनी, सचिव यशवंत बनसोडे, टीना धांडे, आरती जोहरी, लक्ष्मी सुरवाडे अनिता आंबेकर, शांताराम इंगळे, पराग वाणी, विजय मेढे, दत्ता पाटील, संगीता पाटील, राहुल वंजारी, नितीन जैन, संतोष साळवे, धीरज तायडे, अल्ताफ पटेल, संघरत्न सपकाळे, मोहम्मद गवळी, रहीम गवळी, मनोज घोडेश्वर, उमाकांत शर्मा, देविदास जोहरे, अशोक प्रधान, किरण पाटील, भगवान नन्नवरे यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
आई-वडिलांकडून सत्कार झाल्यासारखे जाणवले
भुसावळ स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयात तहसीलदार नीता लबडे यांचा स्वतःचा मोठा फोटो ‘पोट्रेट’ करून भेट म्हणून सत्कार करण्यात आला. हा सत्कार माझ्या घरातील माझ्या आई-वडिलांनी केल्यासारखे मला आज जाणवते, अशा भावना तहसीलदार निता लबडे यांनी बोलून त्या थोड्या वेळ भावूक झाल्या होत्या.