जामनेरात मिरवणूक काढून जैन पर्युषण पर्वाची सांगता

0
10

मिरवणुकीत पारसनाथ ढोल पथक ठरले मुख्य आकर्षण

साईमत।जामनेर।प्रतिनिधी।

येथील पारसनाथ देवस्थान हे दीडशे वर्षांपेक्षा जास्त पुरातन आहे. जैन मंदिराची जैन धमियांतर्फे पवित्र पर्युषण पर्वाची सांगता नुकतीच मिरवणूक काढून करण्यात आली. सजविलेल्या अश्व रथावर इंद्र भरत सैतवाल इंद्रायणी, सुरेखा सैतवाल यांच्यासह पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून पंचरंगी जैन ध्वज घेऊन भाविक जलयात्रेत सहभागी झाले होते. दररोज सकाळी अभिषेक, पूजापाठ, प्रवचन स्वाध्यायाच्या माध्यमातून धर्म ज्ञान वृद्धी केली. दहा दिवसात युवक युवतींसाठी विविध धार्मिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थी व राज्य राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यासोबत जैन साहित्य परिषदेतर्फे प्राचीन ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिनवाणी सजावट स्पर्धाही घेण्यात आली. पारसनाथ ढोल पथक जलयात्रेचे मुख्य आकर्षण ठरले.

कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा साधना महाजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर, शिक्षण संस्थेचे सचिव सुरेशचंद्र धारिवाल, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष वंदना चौधरी, माजी नगरसेवक अतिष झाल्टे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे, डॉ‌‌. स्वप्नील सैतवाल, महेंद्र नवलखा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश सैतवाल, कार्याध्यक्ष विजय सैतवाल सर, सचिव राजेंद्र नारळे, उपाध्यक्ष भरत सूर्यवंशी, सहसचिव संजीव सैतवाल, संचालक प्रशांत सैतवाल, राजेंद्र चतुर, राजू डिकेकर, राजेंद्र खोबरे, रवींद्र मिटकर, रवींद्र जैन, सुदर्शन सैतवाल, दिनेश सैतवाल यांच्यासह महिला मंडळाच्या अध्यक्ष राजुल कस्तुरे, सुनीता विजय सैतवाल, संगीता कस्तुरे, युवा मंचाचे निखिल जैन, भूषण सैतवाल आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here