गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात साहित्यिक प्रा.व.पु.होले यांचे मार्गदर्शन
साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास व मेहनतीने प्रामाणिक प्रयत्न करून मिळविलेले यश भविष्यात आपले जीवन उज्ज्वल करते. मात्र, अवैध मार्गाने मिळविलेले कोणतेही यश भविष्यात अडचणीचे ठरते, असे मोलाचे मार्गदर्शन साहित्यिक प्रा.व.पु.होले यांनी केले. लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे होते.
प्रमुख पाहुणे माजी आमदार अरुणदादा पाटील यांनीही विद्यार्थ्यांनी मोठे अधिकारी व डाॅक्टर होऊन समाजाची सेवा करावी. देशसेवा करून आपला नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी गुणवंत विद्यार्थी देशाची संपत्ती आहे. देशाचे उद्याचे भविष्य त्यांच्या हाती आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक जाणीव ठेवून आई-वडिलांना विसरू नये. आपले व्यक्तिमत्त्व अष्टपैलू बनवावे, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी फैजपूरचे कला शिक्षक राजेंद्र गुलाबराव साळी यांना कला क्षेत्रातील सर्वोकृष्ट कामगिरीबद्दल मोठा पुरस्कार मिळाला. याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. डाॅ.गौरव उमेश चौधरी यांना कन्यारत्न पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार केला. यावेळी लक्ष्मी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. संस्थेला सुमारे ४३ लाख नफा झाला असून तरतुदी वजा जाता १४ लाख नफा वाटणीमधून सभासदांना १२ टक्के डिव्हिडंड देण्याची घोषणा चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी सभेत केली.
यांची होती उपस्थिती
सभेला व्हा.चेअरमन मनोजकुमार पाटील, पंडित कोल्हे, लेखा परीक्षक हेमंत पी.काळे, संदीप पाटील, प्राचार्य व्ही.आर.पाटील, आर.एल.चौधरी, प्रदीप राणे, आर.पी.झोपे, पी.एल.पाटील, संचालक अनिल नारखेडे, सुरेश परदेशी, अप्पा चौधरी, गणेश चौधरी, नीलकंठ सराफ, बंडू माहुरकर, विजय परदेशी, खेमचंद नेहते, उपप्राचार्य जी.इ.चौधरी, सुनील नारखेडे, भास्कर नारखेडे, संचालिका रेवती पाटील, लतिका बोंडे, के.डी.भंगाळे, डाॅ.उमेश चौधरी, चोलदास पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, शेतकी संघाचे संचालक धनंजय फिरके, पद्माकर पाटील, हर्षद महाजन यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी व्यस्थापक जयश्री चौधरी, मनोज वायकोळे, राजेंद्र मानेकर, चंद्रकांत पाटील, तेजस नाथ, प्रकाश चौधरी, युवराज जोगी, तुकाराम बोरोले, नितीन बोरोळे, काशिनाथ वारके, राजेंद्र मिस्त्री यांनी परिश्रम घेतले.