अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा

0
21

वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ६५ महिलांचा सन्मान

साईमत।चोपडा।प्रतिनिधी।

अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त मौर्यक्रांती संघ आणि चोपडा तालुका सकल धनगर जमात यांच्या माध्यमातून “अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा” मूकबधीर विद्यालय बोरोले नगर दोन चोपडा येथे नुकताच घेण्यात आला. त्यात तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ६५ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात नगरसेविका सरला शिरसाठ, पो.पाटील पुष्पा सुलताने, पो.पाटील पुष्पा कचरे, पो.पाटील वैशाली सोनवणे, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, आरोग्य सेविका, वन विभागतील कर्मचारी, वाहक परिवहन मंडळ, अंगणवाडी- शिक्षिका, मदतनीस अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी माजी महापौर सदाशिवराव ढेकळे होते. यावेळी मौर्यक्रांती संघाचे राज्य उपाध्यक्ष बन्सिलाल भागवत, धनगर समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विठूसाहेब बोरसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र लाडगे, निवृत नायब तहसीलदार पारखे नाना, एस.सी.तेले, गोपीचंद शिरसाठ, अमळनेरचे कार्यकर्ते रमेश देव उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी मूकबधिर विद्यालयाच्या अध्यक्षा लिला पाकळे, श्री.पाकळे यांच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून दिली. यावेळी भागवत यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाला उजाळा देत मार्गदर्शन केले.ढेकळे यांनी कंपनीत रोजगाराबाबत सुचवून मार्गदर्शन केले. विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती पवार, बाविस्कर, हडपे यांनी मार्मिक व उपयुक्त माहितीपर मार्गदर्शन केले.

यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रमाला माजी नगरसेवक महेंद्र धनगर, व्हॉ.चेअरमन गोपाल धनगर, डॉ.नरेंद्र शिरसाठ यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.यशस्वीतेसाठी शाम धामोडे, जगदीश कंखरे, नितीन पाकळे, योगेश नहीदे, मनोज भालेराव, जिग्नेश हडपे, उमेश धनगर आदींनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन बी.डी.पाकळे, तालुकाध्यक्ष डी.एस.धनगर तर जिल्हा उपाध्यक्ष आर.सी.भालेराव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here