कार्यकर्त्यांशी संवादात युवानेते अब्दुल समीर यांचे आवाहन
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे हात बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनी केले आहे. शिवसेनेच्या गाव संवाद दौरा अभियान अंतर्गत अब्दुल समीर यांनी तालुक्यातील विविध गावात भेटी देवून येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, उपसभापती कृउपा दारासिंग चव्हाण, नॅशनल सूतगिरणीचे संचालक मारुती वराडे, विठ्ठल सपकाळ, शहरप्रमुख संतोष बोडखे, राजू गौर, अकिल देशमुख, सावळदबारा सरपंच शिवाप्पा चोपडे, नगरसेवक अक्षय काळे, राजु दुतोंडे, सांडू तडवी, मोहंमद आरिफ, रुपेश जैस्वाल, राहुल महाजन, सुनील दुधे, हर्षल देशमुख, सरपंच सुरेश चव्हाण, वंदना सावंत, सुरेखा तायडे, सुशीला इंगळे, कैलास मुळे, गंगाधर सदाशिवे, संतोष आळेकर, भास्कर सोनोने, नितीन शेळके, पंडित राठोड, मेघराज चव्हान, गुलाब राठोड, करतार चव्हाण, किसन सूर्यवंशी, मोहन सुरडकर, गणेश खैरे, भागवत जाधव, दिलीप जाधव, सीताराम चंडोल, हिरा जाधव, ताराचंद पवार, इम्तियाजबी तडवी, राहुल हेल्लोडे, ईश्वर शेळके, विठ्ठल दांडगे, सुपडा रगड, ज्ञानेश्वर वारंगणे, इरफान पठाण, स्वानंद पाटील, गुलाब राणा, अमोल शेळके आदी उपस्थित होते.
संवाद दौऱ्यात अब्दुल समीर यांनी राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, मुख्यमंत्री वयोश्री, तिर्थदर्शन योजना, एक रुपयात पीकविमा, शेतकऱ्यांना वीजबिल माफीसह मोफत वीज यासारख्या अनेक क्रांतिकारी निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतलेली माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे, असे अब्दुल समीर म्हणाले.
विविध विकासकामांची माहिती घरोघरी द्या
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात विकासाचे अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतलेले जनहितार्थ निर्णय, पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांची माहिती घरोघरी देवून, आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन अब्दुल समीर यांनी केले.
ह्या गावांना दिल्या भेटी
अब्दुल समीर यांनी तालुक्यातील पिंपळवाडी, महालब्धा, देव्हारी, टिटवी, पळासखेडा, सावळदबारा, डाभा, नांदा तांडा, घाणेगाव, मोलखेडा, हिवरी या गावांना भेटी दिल्या.