कंपोझ खत तयार करुन प्रतिष्ठानद्वारे लावलेल्या वृक्षांना देणार
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील नगरपालिकेच्या चौकात मंत्री गिरीष महाजन, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, आतिष झाल्टे तसेच सर्व माजी नगरसेवक यांच्या उपास्थितीत निर्मात्य संकलनाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी बैठकीचे ‘श्री’ सदस्य उपस्थित होते.
जामनेर शहरात निर्माल्य संकलनासाठी दोन गटात विभाजन होते. सकाळी १० ते ६ व सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यत अशी श्रीसेवा आठ ठिकाणी स्टॉल लावून प्रत्येक ठिकाणी साधारणत ३० ‘श्री’ सदस्य उपस्थित राहणार आहेत. गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांकडून अतिशय नम्रतेने निर्माल्य घेऊन ते कलशांमध्ये संकलित करतात. ते निर्माल्य टाकळी येथे 6×6 चा मोठा खड्डा तयार केलेला आहे. त्यात कंपोझ खत तयार करुन ते प्रतिष्ठानद्वारे लावलेल्या वृक्षांना देण्यात येणार आहे.
परिसरातील १६ बैठकीच्या माध्यमातून कार्य
निर्माल्य संकलन कार्यक्रमासाठी सकाळी १० ते ६. वेळेत २०० मनुष्यबळ आहे. सात वाहने आहेत. सायंकाळी ६ ते- रात्री १२ वाजेपर्यंत २१० मनुष्यबळ असून नऊ वाहने आहेत. हे सर्व कार्य जामनेर परिसरातील १६ बैठकीच्या माध्यमातून पार पाडले जात आहे.