रामदेव बाबांची उपवासाची उद्या सांगता

0
54

कंजरभाट समाजातर्फे अभिषेक, महाआरतीसह शोभायात्रा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

राजस्थान जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा येथील भगवान श्री रामदेव बाबा यांच्या उपवासाची शुक्रवारी, १३ सप्टेंबर रोजी सांगता होणार आहे. त्यानिमित्त पांडे चौकाजवळील श्री रामदेवबाबा मंदिरात पहाटे साडे पाच वाजता पंडीत ओमप्रकाश तिवारी यांच्या हस्ते श्री रामदेव बाबा मुर्तींचे अभिषेक त्यानंतर महाआरती करण्यात येणार आहे. तसेच कंजरभाट समाजातर्फे सायंकाळी साडे सात वाजता संजय गांधी नगरातील कंजरवाड्यातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

राजस्थान जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा येथील भगवान श्री रामदेव बाबा यांची भाद्रपद शुक्ल पक्ष रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवसापासून भव्य यात्रा सुरु होते. या यात्रेत देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. शहरातील पांडे चौकाजवळील श्री रामदेवबाबा मंदिरात महिनाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. भाविक पदयात्रा, शोभायात्रा, महाप्रसाद, जम्माजागरण विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. भाद्रपद दशमी निमित्त उपवासाच्या सांगता प्रसंगी श्री रामदेव बाबा ट्रस्टतर्फे मंदिरात पंडित ओमप्रकाश तिवारी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करण्यात येणार आहे.

कंजरभाट समाजातर्फे शोभायात्रा

कंजरभाट समाजातर्फे रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवसापासून घरोघरी श्री रामदेव बाबांची विधीवत पुजा करुन पाट मांडतात.काही भाविक पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसांपासून दहा दिवसांचे भाविक उपवास करतात. या भाद्रपद दशमी निमित्ताने उपवासाची सांगता शुक्रवारी सायंकाळी होणार आहे. यानिमित्त कंजरवाड्यातील भाविकांतर्फे भव्य शोभायात्रा कंजरवाड्यातून पांडे चौकातील श्री रामदेव बाबा मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन कंजरभाट समाजातर्फे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here