आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्याचे सुधारित परिपत्रक निर्गमित करा

0
29

मानव विकास पत्रकार संघाचे जिल्हा सचिव हेमंत गायकवाडांची मागणी

साईमत/चोपडा /प्रतिनिधी :

माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यास २८ सप्टेंबर २००८ पासून सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यात हे उपक्रम व्यापक पातळीवर राबविण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेर सादर करावा, अश्याही सूचना दिल्या आहेत.

राज्य शासनाचा शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८ पत्र क्र.३७८/०८/सहा सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,मुंबई २० सप्टेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार, २८ सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात यावा. यादिवशी शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालय विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीचा अधिकार विषयावर आधारित प्रश्न मंजुषा, चित्रकला, निबंध व वकृत्व इत्यादीसारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व्याख्यानमाला आयोजित करावे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने समाजकार्यकर्त्याकरिता व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र स्पर्धा वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमाला आदी उपक्रम आयोजित करावेत. अशा उपक्रमांसाठीच्या पारितोषिकांची व्यवस्था स्थानिक पातळीवर लायन्स क्लब रोटरी क्लब अशा विविध समाजसेवी संस्थांच्या सहयोगाने करण्यात यावी.

शासकीय सुटीच्या आदल्या दिवशी “माहिती अधिकार दिन” साजरा करा

यंदा २८ सप्टेंबर रोजी चौथा शनिवार येत आहे. शासकीय सुटी येत असल्याने सर्व कार्यालये बंद असतील. त्यामुळे शासनास विनंती करण्यात येते की, ज्यावर्षी २८ सप्टेंबर रोजी शासकीय सुटी असेल त्यावर्षी सुटीचे अगोदरच्या दिवशी किंवा नंतरच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी “माहिती अधिकार दिन” उत्सव साजरा करण्याबाबत परिपत्रक शासन स्तरावरून तातडीने निर्गमित करण्यात यावे, असे ई-मेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त यांना चोपडा येथील भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि जळगाव मानव विकास पत्रकार संघाचे जिल्हा सचिव हेमकांत गायकवाड यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here