सेवा काळात उत्कृष्ठ कामगिरी करून उमटविला ठसा
साईमत/निंभोरा,ता.रावेर /प्रतिनिधी :
पुरी गोलवाडे येथील ग्रामसेवक आर.पी. तायडे यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र आयडॉल’ पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागात त्यांनी शासन नियमाच्या अधीन राहुन आपल्या सेवेच्या काळात अनेक ठिकाणी त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करून आपला ठसा उमटविला आहे. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारतर्फे त्यांना गौरविले आहे.
यापूर्वी २००९ मध्ये सांगवी, ता. यावल येथे सेवा बजावित असतांना संपूर्ण गाव हगणदारी मुक्त होणार नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नसल्याचा संकल्प केला होता. तो संकल्प ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण करण्यास यश आले होते. याबद्दल तत्कालिन बीडीओ यांनी त्यांच्या पायात चप्पल घालून त्यांचा सत्कार केला होता. त्यांच्या कार्याची दखल थेट जळगाव जिल्हा परिषदेचे सी.ओ.नी घेऊन त्यावेळस महामहीम तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आर. पी. तायडे यांचा सन्मानित केले होते.
यांनी केले अभिनंदन
याबद्दल पुरी गोलवाडे येथील प्रथम नागरिक स्वप्निल इंगळे, उपसरपंच संतोष पाटील, सदस्य राहुल कोळी, संदीप पाटील, बापु कोळी, सर्व सदस्यांसह बलवाडी येथील सरपंच जितेंद्र महाजन, शेतकरी गुलाबराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर तायडे, रतिराम कोळी, समाधान भालेराव आदींनी अभिनंदन केले आहे.