उबाठा शिवसेनेची मागणी, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :
मशीदमध्ये घुसून मारण्याची धमकी देत बेताल वक्तव्य करून जातीय तणाव निर्माण करणाऱ्या आ. नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्याची आमदारकी रद्द करण्यासाठी शिवसेना (उबाठा) वतीने हातात कोंबडी घेत “कोंबडी चोर नितेश राणे मुर्दाबाद” “कोंबडी चोर नितेश राणे याची आमदारकी रद्द झालीच पाहिजे” अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही” अशा घोषणा देत कोंबड्या हातात घेऊन विश्रामगृह येथुन उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठले. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून बेताल वक्तव्य करणाऱ्या व महाराष्ट्रात जातीय दंगली भडकावू पाहणाऱ्या आ.नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्याची आमदारकी रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, उपशहरप्रमुख शे.समद कुरेशी, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, किसान सेना शहरप्रमुख सै.वसीम, रवींद्र गव्हाळे, पवन गरुड, चाॅद चव्हाण,ओंकार पाटील, जाकीर शहा, असीम खान, रिजवान शहा, वसीम जमादार, नवेद पठाण, मुश्ताक पठाण, शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.