खादगावातील शालेय मुलीचा मृतदेह सापडला, दोन जण बेपत्ता
साईमत/जामनेर/प्रतिनिधी:
तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून जाऊन तीन जणांचा मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे. त्यात इंदिराबाई ललवाणी विद्यालयात बारावी सायन्समध्ये शिक्षण घेणारी १८ वर्षीय विद्यार्थिनी पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर ही खादगाव येथील मुलगी भुसावळ रोड कांग नदीवर असलेल्या पुलावरून जात होते. ती पा ण्याचा प्रवाह पाहून चक्कर येऊन कांग नदी पात्रात पडून वाहून गेली होती. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर मुलीचा मृतदेह खादगाव गावाजवळ नदीपात्रात अाढळून आला. तसेच शहापूर येथील ४० वर्षीय युवक तर मुंदखेडा येथील एक २० वर्षीय तरूण अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले.
सविस्तर असे की, तालुक्यातील शहापूर येथील खडकी नदीवरील दोन्ही गावांना जोडणारा खडकी नदीवर पूल बांधण्यात आलेला आहे. खडकी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पुलावरून शहापूर येथील रहिवाशी मोहन पंडीत सूर्यवंशी (वय ४०) हे घराकडे शहापूर पुरा भागाकडून शहापूर गावाकडे फरशी पुलावरून जात होते. फरशी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाय घसरून खडकी नदीला आलेल्या पुरात ते वाहून गेले. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे एनडीआरएफची टीम शोध घेत आहे.
एनडीआरएफ पथकाकडून शोध सुरु
सुरवाडा शिवारातील रहिवाशी केदार गोरेलाल पावरा (वय २० वर्ष)हा मुंदखेडा येथे काही कामानिमित्त आला होता. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराकडे परततांना सूर नदीवर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असतांनाही जात असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्यात वाहून गेला आहे. त्यांचाही शोध एनडीआरएफ टीमकडून सुरु आहे. एकंदरीत तालुक्यात घडलेल्या तीन घटनेत तीन जणांचा जीव गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, एक मृतदेह सापडला आहे.