शिवसेना जनसंवाद दौरा : संसदरत्न खा.डॉ.श्रीकांत शिंदे पोहोचले शेताच्या बांधावर

0
39

महिला शेतकऱ्यांशी साधला संवाद

साईमत/पारोळा/प्रतिनिधी :

शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे चिरंजीव युवा संसदरत्न खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यातील संवाद दौऱ्याप्रसंगी पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवरातील थेट शेतीच्या बांधावर पोहचले. त्यांनी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे रक्षाबंधन आनंदात पार पडल्याची भावना महिलांनी व्यक्त केल्या.

एरंडोल विधानसभा मतदारसंघांचे आ.चिमणराव पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमाने मतदारसंघात सुरु असलेल्या विकासकामांचा व शासकीय योजनांचा आढावा दिला. यावेळी पक्ष संघटना मजबुतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या योजना तळागळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहचतील. तसेच पक्ष संघटन वाढीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे मार्गदर्शन खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले.

यांची लाभली उपस्थिती

दौऱ्यावेळी शिवसेना नेते माजी खा.संजय निरूपम, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना सचिव तथा शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जळगाव लोकसभेचे संपर्कप्रमुख सुनील चौधरी, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, आ.किशोर पाटील, आ.लताताई सोनवणे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here