Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»सोयगाव»विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह; गलवाडा गावातील घटना
    सोयगाव

    विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह; गलवाडा गावातील घटना

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शवविच्छेदन करून मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

    साईमत/सोयगाव /प्रतिनिधी :

    माहेरी आईकडे आलेल्या विवाहितेचा मृतदेह विहिरीत तरंगत असताना आढळून आल्याची घटना गलवाडा येथे गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोयगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शालिनी धर्मराज सुरवाडे (वय २८, रा.खांडवे, ता. जामनेर, जि. जळगाव) असे विहिरीत मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

    सविस्तर असे की, विवाहिता सासरहुन माहेरी आली होती. बुधवारी पहाटे ती घरातून निघून बेपत्ता झाली होती. तिच्या आईने सोयगाव पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची नोंद बुधवारी केली. मात्र, त्या महिलेचा मृतदेह गुरुवारी सोनसवाडी शिवारात विहिरीत तरंगताना आढळून आला. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. विवाहितेवर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

    विवाहितेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे, अजय कोळी, दिलीप पवार आदी करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Soygaon : १३ वर्षांनंतर घोसला आरोग्य उपकेंद्र पुन्हा कार्यान्वित

    December 15, 2025

    flood ; पुरात रस्ताच गेला वाहून

    October 3, 2025

    Water bodies dry : वेताळवाडी, धिंगापूर,घोसला शिवारातील पाणवठे कोरडेठाक; वन्यप्राणी मृत्यूच्या दाढेत

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.