चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात गुरुवारी, २९ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त व्हॉलीबॉल, कबड्डी, टेबल-टेनिस, बॅडमिंटन अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे होते. त्यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पूजन केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक पी.एस.पाडवी यांनी क्रीडा साहित्याचे पूजन केले. यावेळी त्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पिकलबॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडू अंजली भूपेंद्र पोळ, जिनिषा संदेश क्षीरसागर या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीश सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी रवींद्र पाटी, सुधाकर बाविस्कर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचलन तथा प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख व क्रीडा संचालक डॉ. क्रांती क्षीरसागर तर कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक अमोल पाटील यांनी आभार मानले.