‘गोविंदा आला रे आला…’, न्यू एकता मंडळाचा पवन पाटील ठरला ‘गोविंदा’

0
36

चोपडा शहर सामाजिक, सांस्कृतिक समिती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटातर्फे रोख रकमेसह पुरस्कार प्रदान

साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

चोपडा शहर सामाजिक, सांस्कृतिक समितीतर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षातर्फे कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकालानिमित्त मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी येथील गांधी चौकात जोशपूर्ण वातावरणात दहीहंडीचे आयोजन केले होते. दहीहंडी विजेत्या पथकास राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोख रक्कम २१ हजार १११ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यात विशाल भाऊ युवा मंच, रामपुरा मंडळ, अरुण नगर मंडळ, दारा क्लब सुंदरगढी, क्रांतीवीर समशेर सिंग मंडळ, न्यू एकता मंडळ, महादेव गणेश मंडळ, शिवदाम मंडळ, शिवबा स्पोर्ट अकॅडमी मंडळ, माँ शेरावाली मंडळ, फुलेनगरचा राजा मंडळ अशा शहरातील ११ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. जमिनीपासून २१ फूट उंच असलेली दहीहंडी अरुण नगरातील न्यू एकता मंडळाने चार मनोरे लावून पवन सुनील पाटील ‘गोविंदा’ ठरला. त्याने हवेत जोशपूर्ण उडी मारून दहीहंडी फोडल्याबरोबर कार्यक्रमात सहभागी असलेल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. विजयी पथकाने २१ हजार १११ रुपयांचे बक्षीस प्रायोजकाकडून स्वीकारले. याच मंडळाने क्रमाने सतत तीन वर्ष सलग दहीहंडी फोडण्याचा विक्रम कायम ठेवला. अध्यक्षस्थानी माजी आमदार जगदीशचंद्र वळवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कैलास पाटील उपस्थित होते.

यावेळी चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीतर्फे चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे २०१९ ते २०२१ या कालखंडात नक्षली चकमकींना चोख प्रत्युत्तर देऊन पोलीस खात्यात जी यशस्वी कामगिरी पार पाडली. त्याबद्दल भारताचे राष्ट्रपती महामहीम यांच्याकडील राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्कार जाहीर झाल्याने व पूर्वीही केंद्रीय गृह विभागाच्यावतीने अंतर्गत सुरक्षा पदक, खडतर सेवा पदक तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पुरस्कारांचे धनी असल्याने याच यशस्वी कामगिरीनिमित्त त्यांना माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

चोपडा आगार प्रमुखांचा सन्मानपत्र देऊन गौरव

चोपडा बस स्टॅन्ड सुंदर व स्वच्छ करून ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान’ अंतर्गत महाराष्ट्रातील चोपडा बस स्थानकास नंबर एकचे बस स्थानक म्हणून गौरविण्यात आले. बस स्थानकास साठ लाख रुपयांचे बक्षीस मिळवून दिल्याबद्दल चोपडा शहराचे नाव राज्यात नावलौकिक केले. याकामी मोलाचे योगदान देणारे व व बस स्थानकात प्रवाशांसाठी स्वच्छता, पाणी, हवा यासारख्या सुविधा पुरविणे तसेच बसेस शिस्तीत लावणे अशा कामांचे नियोजन करणारे चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांना चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीने माजी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

पो.कॉ.निलेश सोनवणे यांच्या कार्याची दखल

चोपडा शहराच्या गणेशोत्सव दुर्गोत्सव किंवा सर्व धर्मियांच्या उत्सवांमध्ये सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याचे कार्य तसेच चोपडा शहरात व तालुक्यातील तळागाळातील सर्व नागरिकांचे प्रेमाचे संबंध जोपासून सामाजिक बांधिलकी जपून कायदा व सुव्यवस्था शांतता शिस्त अबाधित राखण्याचे काम पार पाडणारे पोलीस विभागाकडून तब्बल चाळीस रिवार्ड तसेच अनेक पुरस्कारांचे धनी असलेले २०२२ मध्ये चोपडा बस स्थानकात एक लहान बालकाचे प्राण प्रसंगावधानाने वाचविण्याचे बहुमोल कार्य करणारे चोपडा येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश सोनवणे यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस विभागाकडून तसेच रोटरी क्लब चोपडा शहर यांच्याकडून सन्मानचित्र घेऊन गौरविण्यात आले होते. त्यांनाही चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीने माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

गोविंदा पथकांना ३५० टी शर्ट दिले भेट

चोपडा येथील गोविंदा पथकांना पथकनिहाय वेगवेगळ्या रंगांचे ३५० टी शर्ट सामाजिक कार्यकर्ते रोहित निकम यांनी भेट दिले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील पाटील, विजय पाटील, गोपाळ सोनवणे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी चोपडा शहर सामाजिक सांस्कृतिक समितीचे आयोजक भटू पाटील, अर्जुन चौधरी, जितेंद्र शिंपी, नितीन बिरारी, मंगेश पाटील, रामकृष्ण चौधरी, प्रवीण देवरे, भूषण लोहार, सतीश पाटील, मुन्ना सोमानी, अरुण जयस्वाल, सुनील पाटील, मनोज अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here