काळ्या फिती लावून हातात काळे झेंडे घेऊन व्यक्त केला निषेध
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळल्याने संबंधित घटनेला जबाबदार अधिकारीच नव्हे तर सरकारही आहे. त्यामुळे भारतीयांची मान शरमेने खाली झुकली आहे. महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणावर अपमान झालेला आहे. म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नगरपालिकेजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाच्यावतीने सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी निषेध मूक आंदोलन केले. यावेळी काळ्या फिती लावून हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, सुनील बागुले, ॲड. एस.डी. पाटील, शेतकी संघ संचालक बाळकृष्ण पाटील, देविदास धनगर, चोसाका संचालक शरद धनगर, जिल्हा उपाध्यक्ष वैद्यकीय सेल डॉ.संदीप काळे, संजय बोरसे, बी.एम.पाटील, आरिफ शेख सिद्दिकी, रमेश एकनाथ शिंदे, विलास दारुंटे, हाजी मेहबुब तेली, मुख्तार सय्यद, रमाकांत सोनवणे, अशोक साळुंखे, कांतीलाल सनेर, नरेंद्र पाटील, युवराज पाटील, इस्तियाक जहागीरदार, इलियास पटेल, जी.सी.पाटील, आबिद अली सय्यद, प्रकाश पाटील, प्रताप सोनवणे, यशवंत खैरनार, शांताराम लोहार, विलास पाटील, सतीश पाटील, अविनाश साळुंखे, रतिलाल पारधी, नवल भालेराव, देविदास पारधी, सुमित पाटील, महेंद्र शिरसाठ, भागवत सोनवणे, सुभाष पाटील, निवृत्ती पाटील, के.आर.पाटील, राहुल पाटील, हमिदखाँ रशीदखाँ पठाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.