Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»स्वातंत्र्य चौक येथे डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू
    क्राईम

    स्वातंत्र्य चौक येथे डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

    saimat teamBy saimat teamSeptember 29, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    स्वातंत्र्य चौक येथे डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक येथे २८ रोजी डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा आज सकाळच्या सुमारास मृत्यू झाला आहे, याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव शहरातील मंदीराजवळ, व्यंकटेश नगर, हरिविठ्ठल नगर येथे बुधा खंडू बनसोडे (वय ७०) हे शहरात हमालीचे काम करतात. मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता काम आटोपून घराकडे स्वातंत्र्य चौकातून पायी जात होते. त्यावेळी भास्कर मार्केटकडून अमृत योजनेचे डंपर (एमएच १९ झेड २५३४) भरधाव वेगाने आले व बुधा वनसोडे यांना जोरदार धडक दिली. यात ते रस्त्यावर पडले. त्यामुळे डंपरचे पुढचे चाक बनसोडे यांच्या उजव्या पायावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली. दरम्यान याचवेळी पाऊसही सुरू होता.

    या घटनेमुळे प्रचंड धावपळ व वाहतूकीची कोंडी झाली होती. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश पाटील व उमेश ठाकून यांनी अपघातस्थळी धाव घेवून जखमी झालेले बनसोडे यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलीस हंसराज देशमुख व मोहसीन खान यांनी डंपर चालकाला ताब्यात घेवून जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान जखमी बनसोडे हे जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतांना आज बुधवार २९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    त्यांच्या पश्चात पत्नी शोभाबाई, मुलगा अरूण, तीन विवाहित मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी मयत बुधा बनसोडे यांच्या फिर्यादीवरून डंपरचालकावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.