अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :
येथील मकरंद नगर भागात २३ ऑगष्ट रोजी घरफोडी झाली होती. त्यामध्ये रोख रकमेसह किमान सहा लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी वरणगावच्या भाविकांसोबत मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे गाव चिंताग्रस्त होते. अशा परिस्थितीत चोरट्यांनी मात्र आपला हात साफ करून घेतला आहे. यामुळे मकरंद नगर व परिसरात खळबळ उडाली आहे. दुसऱ्या दिवशीही मकरंद नगर टु या भागात चोरटे आले होते. अशी चर्चा झाल्याने पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी संदीप वाघ यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील मकरंद नगरमधील रहिवासी संदीप भिका वाघ हे परिवारासह २३ रोजी जळगाव येथे त्यांच्या काकाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. त्यानंतर लगेच २४ रोजी सांयकाळी पाच वाजे दरम्यान घरी आले. तेव्हा त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दागदागिने व चाळीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.