अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मिळतेय डीबीटी प्रणालीद्वारे मदत

0
40

जळगाव जिल्ह्यात ९१ कोटींचा निधी, अमळनेर मतदारसंघातही मोठी मदत: मंत्री अनिल पाटील यांची माहिती

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :

जानेवारी ते मे २०२४ या चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत मिळणे सुरू झाले आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यात ९१ कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

अमळनेर मतदारसंघातील अमळनेर आणि पारोळा तालुक्यात सर्वाधिक मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना जिल्ह्यात सर्वाधिक २५ कोटींच्या आसपास मदत मिळणे सुरू झाले आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ही मदत दिली जात आहे. जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांना मदत मिळणे सुरू झाले आहे. जळगाव जिल्ह्यात ३२ हजार ३५५.३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ५५ हजार ७१६ शेतकऱ्यांना ९१ कोटी ३८ लाख, ४७ हजार १३४ एवढी मदत दिली जात आहे. पैसे थेट खात्यावर पडू लागल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मदतीबद्दल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

जिल्ह्यात तालुकानिहाय मिळणारी मदत अशी:

जळगाव तालुका शेतकरी संख्या ११३, बाधित क्षेत्र ४२.५० (हे.आर.), निधी १२६८९२०, जामनेर तालुका शेतकरी संख्या तीन हजार ४३४, बाधित क्षेत्र १७९७.४७(हे.आर), निधी ५२१३८१८०, भुसावळ तालुका शेतकरी संख्या १७०, बाधित क्षेत्र ३४.४६ (हे.आर), निधी ११९९८००, बोदवड तालुका शेतकरी संख्या तीन हजार ५३२, बाधित क्षेत्र ३५५६.४७(हे.आर), निधी ९८००७२८०, मुक्ताईनगर तालुका शेतकरी संख्या सात हजार ३३, बाधित क्षेत्र ४४७६.९९ (हे.आर), निधी १४११७१६२०, एरंडोल तालुका शेतकरी संख्या ४५, बाधित क्षेत्र २९.२४ (हे.आर), निधी ३९७६६४, धरणगाव तालुका शेतकरी संख्या २९७, बाधित क्षेत्र ११३.२९ (हे.आर), निधी ३०७५४८०, पारोळा तालुका शेतकरी संख्या आठ हजार ३२१, बाधित क्षेत्र ५११७.५८ (हे.आर), निधी १३७०८४२००, यावल तालुका शेतकरी संख्या एक हजार १९२, बाधित क्षेत्र ४९०.८६ (हे.आर), निधी १५५५२२२०, रावेर तालुका शेतकरी संख्या एक हजार ९५०, बाधित क्षेत्र ११४८.३४ (हे.आर), निधी ४१३४०२४०, अमळनेर तालुका शेतकरी संख्या आठ हजार ८८१, बाधित क्षेत्र ४४११.५९ (हे.आर.), निधी १२०१३६९२०, चोपडा तालुका शेतकरी संख्या नऊ हजार एक, बाधित क्षेत्र ५६३४.४० (हे.आर), निधी १५३२४८४००, पाचोरा तालुका शेतकरी संख्या दोन हजार ४१५, बाधित क्षेत्र ६८५.०२ (हे.आर), निधी १८५२४२५०, भडगाव तालुका शेतकरी संख्या एक हजार ७७६, बाधित क्षेत्र ७९०.१४ (हे.आर.), निधी २१४५२७६०, चाळीसगाव तालुका शेतकरी संख्या सात हजार ५५६, बाधित क्षेत्र ४०२६.९५ (हे.आर), निधी १०९२४९२०० अशी जिल्ह्यातील तालुक्यांना मदत मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here