झोडगाला जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात निवृत्ती तांबे यांचे प्रतिपादन
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी:
मातंग समाजातील युवकांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार अंगीकारुन स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी एकजुटीने समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांचा त्याग करावा, असे प्रतिपादन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस निवृत्ती तांबे यांनी केले. झोडगा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विचार व्यक्त करताना ते बोलत होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा रविवारी, २५ रोजी १०४ वा जयंती उत्सव सोहळा झोडगा येथे पार पडला. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे जिल्हा संघटक मेजर शंकर आव्हाड, तालुकाध्यक्ष गणेश क्षीरसागर, एकनाथ आव्हाड, ग्रा.पं.सदस्य कडु कोऺगळे, कैलास मोरे, जनार्दन कोळंगे, समाधान आव्हाड, जगदेव वाघमारे, विठ्ठल पोडये, प्रवीण अंभोरे, मरी कसारे, श्रीकृष्ण लाखे, बारसु महाले, विष्णू घोडे, सुखदेव आव्हाड, पुरषोत्तम महाले, गजानन वाघमारे,भागाजी हिवाळे, उमेश वाघमारे, श्रीकृष्ण आव्हाड, गणेश कांबळे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मंगेश निकाळजे, अमोल आव्हाड, सागर महाले, समाधान वाघमारे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.