दुसऱ्या बसमधील भाविकही घरी परतले…!
साईमत/वरणगाव/प्रतिनिधी
नेपाळ दुर्घटनेत सात जखमींना काल सायंकाळी मुंबईला आणले आहे. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर एक-दोन दिवसातच त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती काठमांडूच्या डॉक्टरांनी दिली आहे. चार वाजेच्या इंडिगो विमानाने मुंबईला पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे हे सर्वांच्या संपर्कात आहेत. दुसऱ्या बसमधील भाविकही घरी परतले आहे.
काठमांडू येथे प्रशांत पाटील, अतुल झांबरे, गोलू पाटील, अमोल जावळे हे पूर्ण परिस्थिती कळवित आहे. मुंबईला केईएम हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी व उपचार करून त्यांना एक ते दोन दिवसात घरी पाठविले जाईल. राज्याचे मंत्री गिरीष महाजन मुंबई येथील व्यवस्था करीत आहेत.
दुर्घटनेतील असे आहेत सात जखमी
दुर्घटनेतील सात जखमींमधील भारती पाटील, सुनील धांडे (भुसावळ), वर्षा भंगाळे, कुमुदिनी झांबरे, रूपाली सरोदे, हेमराज सरोदे, नीलिमा भिरूड (वरणगाव) यांना मुंबई येथे आणण्यात आले आहे. त्यांच्यासोबत गोलू पाटील, अमोल जावळे, केदार ओक हे आलेले आहेत.
आमच्याबरोबर गेलेले देवाने हिरावून घेतले…!
यात्रेसाठी सोबत गेलेले दुसऱ्या बसमधील ४८ भाविक रेल्वेने भुसावळ येथे रविवारी पोहोचले. त्यांच्या प्रतिक्रिया खरोखर चिंताजनक होत्या. आम्ही खूप मोठ्या संकटातून वाचलो असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याबरोबर गेलेले देवाने हिरावून घेतले, त्याचे खुप दुःख आहे.