नेपाळ दुर्घटनेतील मृत भाविकांना श्रद्धांजली
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतर्फे (काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, आणि उबाठागट) बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निषेध मूक आंदोलन करण्यात आले. शनिवारी मविआतर्फे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला होता. परंतु उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने त्यांच्या आदेशाचे पालन करून आदर राखून महाराष्ट्र बंद रद्द करण्यात आला. त्याऐवजी बदलापूर येथील घटनेच्या शासनाच्या व प्रशासनाचा नाकर्तेपणाचा निषेध महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला. तसेच नेपाळ येथील दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविक पर्यटकांचे अपघाती निधन झाले. त्यांना मविआतर्फे श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.
आंदोलननात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश सिताराम पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.पाटील, डी.पी.साळुंखे, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अतुल ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, डॉ.चंद्रकांत बारेला, नेमीचंद जैन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अनिल पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या ज्योती बारेला, किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, शेतकी संघाचे संचालक बाळकृष्ण पाटील, बी एम.पाटील, आरिफ शेख सिद्दिकी, माजी नगरसेविका सुरेखा माळी, जी.सी.पाटील, माजी नगरसेवक फातिमा पठाण, मुख्तार सय्यद, लक्ष्मण काविरे, चेतन बाविस्कर, अनिल युवराज पाटील, रमाकांत सोनवणे, चोपडा सुतगिरणीचे संचालक देविदास सोनवणे, ॲड.एस. डी.पाटील, प्रताप सोनवणे, सुमित पाटील, आबिद अली, यशवंत खैरनार, शांताराम लोहार, संजय बोरसे, इलियास पटेल, मुक्ततार शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.