वढोदातील जि.प.च्या मराठी शाळेत बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

0
37

सरपंच, उपसरपंचासह सदस्यांच्या निर्णयाचे स्वागत

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

बदलापुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा अध्यादेश काढलेला आहे. त्यातच तालुक्यातील वडोदा येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेत सरपंच स्वप्ना संदीप खिरोळकर, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांनी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून तरतूद करत शाळेत १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

तालुक्यातील वडोदा येथील मराठी शाळेत ३५० विद्यार्थी संख्या आहे. मुलांची शाळेसह परिसरात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे. तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय वढोदा येथील सरपंच, ग्रा.पं.सदस्यांनी घेतला. यावेळी सरपंच स्वप्ना खिरोळकर, उपसरपंच रंजना कोथळकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन खिरोळकर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्याध्यापक उन्हाळे, शिक्षक उपस्थित होते.

सर्व शाळांना पत्र देणार : गटशिक्षणाधिकारी

मुक्ताईनगर तालुक्यात सर्व माध्यमांच्या शाळा मिळून १४९ शाळा आहेत. त्यापैकी तालुक्यातील १२ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. उर्वरित सर्व माध्यमांच्या शाळांना शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याविषयीचे पत्र देण्यात येणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी मदन मोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here