आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक, महिलांचा सहभाग
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोयगाव येथे आंदोलन करुन मोर्चा काढण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह सोयगावातील नागरिकांसह महिलांनी मोठ्या संख्येने निषेध आंदोलनात सहभाग घेतला होता.
आंदोलनास शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यत मोर्चा काढण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह सोयगावातील नागरिकांसह महिलांनी आपला सहभाग घेतला होता.
यावेळी शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ज्योती काळे, उबाटा गटाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.इंद्रजीत साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवी काळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिलीप मचे, तालुका संघटक गुलाबराव कोलते पाटील, दिनेश हजारी, कृष्णा पाटील , अजय नेरपगार आदी उपस्थित होते.