Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अडावदला दोन गटात दंगल, परिस्थिती नियंत्रणात
    क्राईम

    अडावदला दोन गटात दंगल, परिस्थिती नियंत्रणात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 22, 2024Updated:August 22, 2024No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दंगलीत दहा ते बारा जण जखमी, ॲट्रॉसिटीसह परस्परविरोधी तक्रारीवरून ९३ जणांवर गुन्हा दाखल

    साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

    तालुक्यातील अडावद येथे बुधवारी, २१ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गावातील तडवी आणि मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये तकिया मशिदीजवळील मागील बाजुस ट्रस्टच्या मालकीच्या असलेल्या रिकाम्या जागेवर मदरसा बांधण्याच्या कारणावरुन वाद सुरु आहे. त्या वादाच्या कारणावरुन मुस्लिम आणि तडवी समाजाच्या ४० ते ५० जणांनी एकमेकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडफेक करुन शिवीगीळ, दमदाटीसह चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेत दोन्ही गटातील जवळपास १२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चोपड्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, अडावदमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

    याप्रकरणी ४१ जणांवर सीआरपीसी १४०/२०२४ अन्वये भारतीय नागरी संहिता १०९, ११०, १८९(२), १९०, ३५२, ३५१(२) व अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांना अमळनेर न्यायालयात गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी हजर केले होते. त्याचप्रमाणे सीआरपीसी १४१/२०२४ अन्वये गुन्हा अन्वय भारतीय नागरी संहिता १०९, ११०, १८९(२), १९०, ३५२, ३५१(२) नुसार ५२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सहा जणांना चोपडा फौजदारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

    ४१ जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

    अडावद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जहांगीरखां गफ्फारखां पठाण, रियाज शेख कबिरोद्दीन शेख, रियाजअली अजगरअली सैय्यद, शेख एजाज शेख अब्दुल रैउफ, बिलाल शेख हा एजाज शेखचा भाचा, बबलु मोईद्दीन, नाशीर खां खलील खाँ, वईद नाशीर खान, जुबेर नाशीर खान, पप्पु नाशीर खान, नसैरुल अब्दुल रउफ, साजीद असलम खान, मोहसिन जबीउल्ला खाँ, अजिम अमिर खान, मोईनोद्दीन जबीउल्ला खान, रहेबर अली सैय्यद अली, बाबु सैय्यद अली, इम्रान खान माजित खान, रईश खलील टेलर, खलील शहा मंडपवाले, अजहर जहीर, अशपाक खलील, आशीक अजगर पठाण, अबरार युनुस पठाण, शाहरुख युनुस पठाण, जाकीर जहीर, आजिम अमीर, तैसिक रियाज, अरशद खान इस्माईल खान, जावेद खान अमीन खान, शेख रईस शेख रसीद, शेख अजहर शेख मोयद्दीन, मिसबाह एजाज शेख, अजरुल अब्दुल गफूर, कासिम महेमुद, जुबेर बाबु पठाण, फैजल खान इबादुल्ला, मोसिम खान ईस्माइल खान, तन्वीर खान युसुफ खान, खलील शहा जकीर शहा, तैसिफ अजगर अली सैय्यद (सर्व रा. अडावद) अशांवर गुन्हा दाखल केला आहे.

    दुसऱ्या तक्रारीतील संशयित आरोपी रमजान छबु तडवी, पप्पु छबु तडवी, गोलु छबु तडवी, सबाना छबु तडवी, साबीरा छबु तडवी, सुलेमान बहादुर तडवी, तनुजा लाला तडवी, अमन लाला तडवी, शरीफ नादर तडवी, महेरबान रज्जाक तडवी, रुबाब नादर तडवी, फिरोज जुम्मा तडवी, पिरखॉ ईमामा हसन, राजु ईमाम तडवी, आसीफ इमाम तडवी, शकील सुभान तडवी, फिरोज ईतबार तडवी, अकबर नामदार तडवी, गोलु फत्तु तडवी, जहाँगीर सत्तार तडवी, शरीफ सत्तार तडवी, अफरोज सलिम तडवी, अलताफ रज्जाक तडवी, अखतर गुलशेर तडवी, अलताफ लायक तडवी, गुड्या सत्तार तडवी, आसीफ सत्तार तडवी, मुस्ताकीम सुभान तडवी, मोहम्मद शाहा सुभान शाहा, अलीयार रमजान तडवी, मोहसीन अलीयार तडवी, अलताफ अलीयार तडवी, आझाद नबाब तडवी, जाकीर कलिंदर तडवी, मुस्ताफा फकिरा तडवी, जरीना गुलाब तडवी, मिना रहेमान तडवी, आबेदा गुलाब तडवी, सायरा जहाँगीर तडवी, ईरशाद लालखॉ तडवी, जुबेदा बादल तडवी, शाहरुख हैदर तडवी, शबनम अलताफ तडवी, अलीशान रज्जाक तडवी, सबनुर शरीफ तडवी, अलताफ कालु तडवी, नबाब ईतबार तडवी, कालु सिंकदर तडवी, चिंगा फकिरा तडवी, ईस्माईल मरदान तडवी, छायाबाई मोहसीन तडवी (सर्व रा. अडावद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    फरार झालेल्या आरोपींना शोधण्यासाठी पथकाची नेमणूक

    यावेळी अपूर्ण पोलीस कुमकसह सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांनी जमाव थोपवून ठेवत चोपडा शहर, ग्रामीण पोलीस स्टेशन, जळगावहून महिला राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व स्पेशल कमांडो फोर्स दाखल झाल्यावर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकाने घटना घडलेल्या भागात जावून दंगेखोरांवर नियंत्रण मिळविले. रात्री दोन वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक अडावद पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. पहाटे चार वाजेपर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.कविता नेरकर ठाण मांडून होत्या.

    दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाने दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरोधात ९३ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फरार झालेल्या आरोपींना शोधण्यासाठी पथक नेमण्यात आलेले आहेत. पुढील तपास स.पो.नि. प्रमोद वाघ, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Entrepreneur Attacked Brutally : उद्योजकावर जीवघेणा हल्ला ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

    December 18, 2025

    Jalgaon : विषारी औषध सेवन केल्याने तरूणाचा उपचारावेळी मृत्यू

    December 18, 2025

    Jalgaon : एका लाखासाठी विवाहितेचा छळ

    December 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.