टाकरखेडा शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प.मराठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशन संचलित प्रमिलाई व मोहनराव परिवार मनोरुग्ण निवासी पुनर्वसन प्रकल्पात वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त मनोरुग्णांना भोजनासह रक्षाबंधननिमित्त १२ महिला रुग्णांना कपड्यांचे वाटप तसेच त्यांनी संपादित केलेले “माय-बाप”, स्वलिखीत चारोळी काव्यसंग्रह, किलबिल पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
मनोरुग्ण किंवा निराधार लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. समाजात अशी काही ठराविक माणसे आहेत की, अशा मनोरुग्ण किंवा निराधार लोकांविषयी काळजी वाटते. अशावेळी ते मदतीचा हात पुढे करतात. त्यामुळे त्यांना दानशूर व्यक्तींमुळे हातभार लागतो, असे मनोगत पी.टी.पाटील यांनी व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी आत्मसन्मान फाउंडेशनचे व्यवस्थापक वासुदेव साखरे, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव राजेश काळबैले, सेवेकरी रवींद्र माळी, आकाश बावस्कर, स्वयंपाकी मनीषा भगत उपस्थित होते. प्रास्ताविक, सुत्रसंचलन तथा आभार वासुदेव साखरे यांनी मानले.